Wikipedia

Search results

Monday 18 July 2022

आपल्या आध्यात्मिक प्रवासाला आरंभ करा !

 

‘ज्याच्यापासून आपली निर्मिती झाली, त्याचा शोध घ्यावा, त्याच्याकडे जावे, असे प्रत्येकालाच वाटते. एखाद्याला मोठेपणी कळले की, तो समजतो ती त्याची खरी आई नसून जन्मदात्री आई दुसरीच आहे आणि ती अमुक एका ठिकाणी आहे, तर तो तिचा शोध घेऊन तिला भेटेल. सुट्टीत आपण कोणत्याही प्रेक्षणीय स्थळी गेलो, अगदी परदेशात गेलो, तरी परत घरी येण्याची ओढ आपल्याला असते. तसेच ज्या परमेश्वरापासून आपली निर्मिती झाली, त्याचा शोध घ्यावा, त्याच्याकडे जावे, असे प्रत्येकालाच सूक्ष्म रूपाने तरी वाटत असतेच. त्यामुळे प्रत्येकाला आध्यात्माची ओढ असतेच.

सर्वसाधारण व्यक्‍तीच्या जीवनात २० टक्के समस्या शारीरिक आणि / किंवा मानसिक कारणांमुळे निर्माण होतात, ३० टक्के समस्या शारीरिक आणि / किंवा मानसिक, तसेच आध्यात्मिक कारणांमुळे निर्माण होतात आणि उरलेल्या ५० टक्के समस्या निवळ आध्यात्मिक कारणांमुळे निर्माण होतात. म्हणजेच जीवनातील ८० टक्के समस्या साधनेमुळे सुटतात किंवा त्या सहन करण्याची (प्रारब्ध भोगण्याची) शक्‍ती साधनेमुळे मिळते.

यासाठी आपल्या आध्यात्मिक प्रवासाला आत्तापासूनच आरंभ करा !

  • नामजप : कलियुगातील श्रेष्ठ उपासना !
  • नामजप कोठे करावा ?
  • नामजप कोणता करावा ?
  • नामजप अधिक चांगला होण्यासाठी साहाय्यभूत असलेली ‘स्वभावदोष निर्मूलन प्रक्रिया’ !
  • अहं : ईश्‍वरप्राप्तीतील अडथळा !
  • कोणत्या मार्गाने साधना करावी ?
  • नामजप : कलियुगातील श्रेष्ठ उपासना !

    ‘यज्ञानां जपयज्ञोस्मि ।’ अर्थात ‘कलियुगात सर्व यज्ञात ‘मी’ जपयज्ञात आहे.’ भगवान श्रीकृष्णाने महाभारतात सांगितलेले हे वचन नामाचे महत्त्व स्पष्ट करते. केवळ नामानेच ‘वाल्ह्या’चा ‘वाल्मिकी होऊ शकतो, यांतच नामाचे विशेषत्व, सर्वश्रेष्ठत्व सिद्ध होते. ईश्वराच्या नामाचे विशेष महत्त्व जाणून घेऊन वाचकांनी योग्य नामसाधनेला आरंभ करावा, हीच भगवान श्रीकृष्णाच्या चरणी प्रार्थना !

    नामजप कोठे करावा ?

    ‘सर्वकाही ईश्‍वरानेच निर्माण केलेले असल्याने कोठेही, कधीही त्याचे नाव घ्यावे. एकाच ठिकाणी बसून नामजप करण्यापेक्षा व्यवहारातील सर्व कामे करत असतांना नामजप करणे, ही श्रेष्ठ प्रतीची साधना आहे; कारण त्यात एकतर साधना अखंड चालू रहाते आणि दुसरे म्हणजे व्यक्ती व्यवहारातील कामे करत असतांना, नामजपामुळे मायेत असूनही नसल्यासारखी असते. अशा सर्व स्थितींत भगवंताशी अनुसंधान साधणे, यालाच ‘सहजस्थिती’ किंवा ‘सहजावस्था’ असे म्हणतात.

    नामजप कोणता करावा ?

    अ. गुरूंनी दिलेले नाम

    ‘आपल्या प्रगतीसाठी कोणते नाम घ्यावे’, हे आपल्याला कळत नाही; गुरुच सांगू शकतात. त्यासाठी त्यांनी एखादा नामजप करण्यास सांगितला असल्यास तो करावा. गुरूंनी दिलेले नाम घेतांना अहंभाव नसतो. स्वतःच्या आवडत्या देवाचे नाव घेतांना थोडातरी अहंभाव असतो.

    आ. कुलदेवता

    नाम देणारे कोणी योग्य गुरु न भेटल्यास आपल्या कुलदेवतेचा, म्हणजे कुलदेवीचा किंवा कुलदेवाचा जप करावा.

    कुलदेव आणि कुलदेवी असे दोन्ही असल्यास कोणता नामजप करावा ?

  • लहानपणी आई-वडील असतांना आपण आईकडेच अधिक हट्ट करतो; कारण ती हट्ट लवकर पुरवते. तसेच कुलदेवापेक्षा कुलदेवी लवकर प्रसन्न होते.
  • कुलदेवापेक्षा कुलदेवी ही पृथ्वीतत्त्वाशी अधिक संबंधित आहे. तिच्यापासून साधनेला आरंभ केला की कुठलाही त्रास होत नाही.
  • ज्यांना केवळ कुलदेव आहे, त्यांनी त्याचा जप करावा, उदा. श्री व्यंकटेश कुलदेव असेल, तर ‘श्री व्यंकटेशाय नमः’ जप करावा.
  • परात्पर गुरूंनी दिलेला नामजप आध्यात्मिक उन्नतीसाठी १०० टक्के, कुलदेवीचा ३० टक्के, तर कुलदेवाचा २५ टक्के पूरक असतो.
  • इ. अतृप्त पूर्वजांच्या त्रासांपासून रक्षण होण्यासाठी श्री गुरुदेव दत्ताचा नामजप करा !

    हल्लीच्या काळी पूर्वीप्रमाणे कोणी कुटुंबातील मृत व्यक्तीचे श्राद्ध-पक्ष करत नाही, तसेच साधनाही करीत नसल्याने बहुतेक सर्वांनाच पूर्वजांच्या लिंगदेहांमुळे त्रास होतो. पूर्वजांमुळे त्रास होण्याची शक्यता आहे किंवा त्रास होत आहे, हे उन्नतच सांगू शकतात.

    नामजप अधिक चांगला होण्यासाठी साहाय्यभूत असलेली ‘स्वभावदोष निर्मूलन प्रक्रिया’ !

    साधारणपणे आपल्या प्रत्येकातच राग, चिडचिडेपणा, आळस, विसराळूपणा इत्यादी स्वभावदोष अल्प-अधिक प्रमाणात असतात. स्वभावदोष असलेली व्यक्‍ती ईश्‍वराशी कधीही एकरूप होऊ शकत नाही. स्वभावदोषांमुळे साधनेत हानीही होते. स्वभावदोष असण्याचा आणखी एक तोटा म्हणजे स्वभावदोषांचा फायदा उठवून आसुरी शक्‍तींना त्रास देणे सोपे होते. यासाठी साधकानेच नव्हे, तर प्रत्येकानेच स्वभावदोष दूर करण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्‍न करणे आवश्यक असते.

    नामजप अधिक चांगला होण्यातील मुख्य अडथळा म्हणजे व्यक्‍तीतील स्वभावदोष !

    समजा, एखाद्याचा स्वभाव अतिशय रागीट आहे आणि लहान लहान गोष्टींवरूनही तो दुसर्‍यांवर रागावत असतो. त्यामुळे त्याची मनःस्थिती बिघडल्याने त्याला मनाची एकाग्रता साधता येत नाही आणि त्याच्या हातून चुका होऊन त्याची कार्यक्षमता घटते. तसेच रागावण्यामुळे साधकाला साधनेतून मिळणारे समाधान टिकवता येत नाही. असा मनुष्य जेव्हा इतरांशी रागावून बोलतो, तेव्हा इतरांना वाईट वाटते किंवा ते दुःखी होतात. याची परिणती इतरांचीही मनःस्थिती बिघडण्यात होते. पुढे इतरांना त्याच्याशी बोलतांना एकप्रकारचा ताण जाणवतो, म्हणजेच इतरांना त्याच्याशी सुसंवाद साधता येत नाही.

    अहं : ईश्‍वरप्राप्तीतील अडथळा !

    व्यक्‍तीमध्ये अहंचा थोडा जरी अंश असला, तर तिला ईश्‍वरप्राप्ती होणार नाही. यासाठी साधना करत असतांना अहं-निर्मूलनासाठी जाणीवपूर्वक प्रयत्‍न करणे आवश्यक असते. प्रार्थना, कृतज्ञता, शारीरिक सेवा यांसारख्या कृतींनी अहं अल्प होण्यास मदत होते.

    कोणत्या मार्गाने साधना करावी ?

    साधना करतांना गुरुकृपेशिवाय सर्व काही व्यर्थ आहे ! गुरुकृपेच्या माध्यमातून ईश्वरप्राप्तीच्या दिशेने वाटचाल होणे, यालाच ‘गुरुकृपायोग’ असे म्हणतात. ‘गुरुकृपायोग’ या योगाचे वैशिष्ट्य म्हणजे ज्ञानयोग, कर्मयोग, ध्यानयोग, भक्तीयोग अशा सर्व साधनामार्गांना सामावून घेणारा, असा हा ईश्वरप्राप्तीचा सहजसुलभ मार्ग आहे.

    गुरुकृपायोगानुसार करावयाच्या साधनेचा एकच सिद्धांत आहे आणि तो म्हणजे ‘व्यक्ती तितक्या प्रकृती, तितके साधनामार्ग’. पृथ्वीवरची  लोकसंख्या सातशे कोटीहून अधिक आहे; म्हणून ईश्वरप्राप्तीचे सातशे कोटीहून अधिक मार्ग आहेत. या संख्येतील कोणतीही दोन माणसे एकसारखी नसतात. प्रत्येकाचे शरीर, मन, आवडी-निवडी, गुणदोष, आशाआकांक्षा, वासना निराळ्या असतात. प्रत्येकाची बुद्धी निराळी असते, संचित, प्रारब्ध निराळे असते; प्रत्येकातील पृथ्वी, आप, तेज, वायु आणि आकाश ही तत्त्वे (मनुष्य या पंचतत्त्वांपासून बनला आहे.) अन् सत्त्व, रज आणि तम हे त्रिगुण यांचे प्रमाण निरनिराळे असते. थोडक्यात प्रत्येक जण वेगवेगळ्या प्रकृतीचा आणि पात्रतेचा असल्याने ईश्वरप्राप्तीचे साधनामार्गही अनेक आहेत. आपली प्रकृती आणि पात्रता यांना अनुरूप अशी साधना केल्यास ईश्वरप्राप्ती लवकर होण्यास साहाय्य होते. सनातन संस्थेचे सहस्त्रो (हजारो) साधक गुरुकृपायोगाच्या एकाच छत्राखाली आपापली निरनिराळी साधना करत आहेत.

     

     

     

     
  •  

संकेतस्थळावर उपलब्ध असलेल्या ज्ञानाचे केलेले वर्गीकरण

 

अ. अध्यात्म जाणून घ्या !

यातील लेख प्रामुख्याने अध्यात्माची तात्त्विक माहिती देणारे आहेत, उदा. अध्यात्माचे महत्त्व, साधनामार्ग, सोळा संस्कार, जिवाची ईश्वरावरील श्रद्धा वाढवणारे शास्त्र – अनुभूती इत्यादी.

आ. अध्यात्म कृतीत आणा !

अध्यात्माच्या प्रायोगिक स्तरावरील लेखांचा यात अंतर्भाव करण्यात आला असून धर्मशिक्षण, सण, व्रते, उत्सव, काळानुसार योग्य साधनेचे महत्त्व, आध्यात्मिक त्रास आणि त्यांवरील उपाय, वास्तूशुद्धी, वाहनशुद्धी या विषयांवरील लेख ठेवण्यात आले आहेत. हिंदु धर्मातील प्रमुख सर्व सणांवरील लेखमालिका यात आहेत, उदा. गुढीपाडवा, श्रीरामनवमी, गणेशचतुर्थी, नवरात्र, दिवाळी, मकरसंक्रांत, महाशिवरात्र इत्यादी. साधनेच्या अनुषंगाने गुरुकृपायोगातील अष्टांगसाधनेतील प्रत्येक टप्प्याविषयीचे लेख (नाम, सत्संग, सेवा, त्याग) यात आहेत.

इ. विश्वव्यापी सनातन (हिंदु) धर्म

या वैशिष्ट्यपूर्ण विषयांतर्गत हिंदु धर्म, धर्मग्रंथ, हिंदू राष्ट्र, कुंभमेळा, हिंदु देवता यांविषयीचे लेख ठेवण्यात आले आहेत. ‘माय मराठी’च्या रक्षणासाठी प्रत्येकाने तळमळीने प्रयत्न करणे, ही काळाची आवश्यकता ओळखून मातृभाषा आणि सात्त्विक मराठी भाषेचे रक्षण अन् संवर्धन यांसाठी ‘मराठी राजभाषा दिना’निमित्त नुकतीच एक वैशिष्ट्यपूर्ण लेखमालिका संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.

ई. सनातनचे अद्वितीयत्व

या भागाच्या अंतर्गत आध्यात्मिक संशोधन, ईश्वरप्राप्तीसाठी विविध कला, गुरुकृपायोगानुसार साधना करुन झालेले संत या विषयांवरील वैशिष्ट्यपूर्ण लेखांद्वारे सूक्ष्मातील अलौकिक ज्ञान विश्वाला देण्यात आले आहे.

उ. अपसमज आणि त्यांचे खंडण

या सदरात धर्मद्रोह्यांकडून समाजात पसरवले जाणारे अध्यात्म, देवता, धर्म, धर्मग्रंथ, प्रथा परंपरा इ. विषयींच्या अपसमजांचे खंडन करण्यात आले आहे.

ऊ. आध्यात्मिक उपाय

जीवनातील ८० टक्के दुःखांमागे आध्यात्मिक कारण असते, असे अध्यात्मशास्त्र सांगते. त्यामुळे कित्येक शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक स्तरावरील दुःखांवर आध्यात्मिक स्तरावर उपचार करणे आवश्यक असते. त्यासाठी आध्यात्मिक स्वरूपाचे त्रास कसे असतात आणि त्यावर काय उपाय योजावेत, यांची माहिती देणारा विभाग !

ए. विविध उपचार पद्धती (आपत्काळासाठी संजीवनी)

संत-महात्मे, ज्योतिषी आदींच्या सांगण्यानुसार आगामी काळ हा भीषण आपत्काळ असून या काळात समाजाला अनेक आपत्तींना तोंड द्यावे लागणार आहे. आपत्काळात स्वतःसह कुटुंबियांच्याही आरोग्याचे रक्षण करणे, हे मोठे आव्हानच असते. आपत्काळात दळणवळण तुटल्यामुळे रुग्णाला रुग्णालयात नेणे, डॉक्टर वा वैद्य यांच्याशी संपर्क साधणे आणि पेठेत (बाजारात) औषधे मिळणेही कठीण होते. आपत्काळात ओढवणार्‍या विकारांना तोंड देेण्याच्या पूर्वसिद्धतेचा एक भाग म्हणून सनातन संस्था भावी आपत्काळातील संजीवनी ही ग्रंथमालिका सिद्ध (तयार) करत आहे. या सदरात सांगितलेल्या उपायपद्धती केवळ आपत्काळाच्या दृष्टीनेच नाही, तर एरव्हीसाठीही उपयुक्त आहे. या लेखातून वाचकांना या उपायपद्धतीची ओळख होईल.

ऐ. अध्यात्मविषयी शंकानिरसन

अध्यात्मातील सैद्धांतिक भागाचा कितीही अभ्यास केला, तरी मनातील शंकांचे निरसन झाल्याविना साधना नीट होत नाही. या दृष्टीने जगभरातील जिज्ञासू आणि साधक यांच्या मनात अध्यात्मशास्त्राच्या सैद्धांतिक अन् प्रायोगिक भागांविषयी सर्वसाधारणपणे उद्भवणार्‍या (आत्मा, मुक्ती, मोक्ष, वेद, देवता, प्रारब्ध आदी) शंकांचे निरसन या सदरातून होईल. त्याचप्रमाणे स्त्रियांनी गुरुचरित्र किंवा गायत्री मंत्र का म्हणू नये, कर्मकांडातील नियम, तसेच धर्मभ्रष्टांच्या शुद्धीकरणासंबंधी हिंदु धर्मशास्त्र काय सांगते ? आदींचे शास्त्रीय विवेचनही येथे केले आहे.

ओ. श्राव्य दालन (ऑडियो गॅलरी)

श्राव्य दालनामध्ये (ऑडियो गॅलरीमध्ये) ‘विविध देवतांचे नामजप’, ‘देवतांच्या आरत्या’ ठेवल्या आहेत. तसेच सनातन-निर्मित देवतांची सात्त्विक चित्रेही संकेतस्थळावरून संरक्षित (download) करण्यासाठी ठेवण्यात आली आहेत.

औ. सूक्ष्म-जगताशी संबंधित अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण विभाग

सूक्ष्म म्हणजे पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील विश्व ! ‘अथर्ववेदा’तही सूक्ष्म-जगताशी संबंधित माहिती आहे. अनेक प्रगत राष्ट्रांतही विविध गुन्ह्यांची उकल करण्यासाठी एखाद्या व्यक्तीला पछाडलेल्या भूताचा वापर केला जातो. आज या अज्ञात शक्तींविषयीशास्त्रशुद्ध माहिती नसल्याने अनेकजण अंधश्रद्धांना खतपाणी घालतांना दिसतात. कित्येक जण तर भोंदू मांत्रिकांच्या फसवणुकीला बळी पडत आहेत. हे टाळण्यासाठी या जगताची माहिती देणारे अनोखे विभाग या संकेतस्थळावर आहेत.

क. आध्यात्मिक संशोधन

सनातनने ‘इलेक्ट्रोसोमॅटोग्राफिक स्कॅनिंग मशिन’ (DDFAO), ‘पॉलिकॉन्ट्रास्ट इन्टरफिअरन्स फोटोग्राफी’ (PIP), ‘इलेक्ट्रोस्कॅनिंग मेथड’ (ESM) आणि ‘गॅस डिस्चार्ज व्हिज्युअलायझेशन’ (GDV) या वैज्ञानिक उपकरणांद्वारे विविध प्रकारचे सहस्त्रो प्रयोग केले आहेत. या सर्व प्रयोगांच्या संशोधनांतून जीवनात साधना करण्याचे महत्त्व, तसेच भारतीय संस्कृती, संगीत, आहार इत्यादींचे श्रेष्ठत्व सिद्ध झाले आहे. त्याची माहिती या विभागात देण्यात आली आहे.

ख. सात्त्विक रांगोळ्या

विविध देवतांची तत्त्वे आकृष्ट करणार्‍या सात्त्विक रांगोळ्यांच्या कलाकृती उपलब्ध !

‘ऑनलाईन’ प्रसारात वृद्धी – अन्य संकेतस्थळांद्वारे सनातनच्या संकेतस्थळाचा व्यापक प्रसार करण्यात येणे

‘सनातन संस्थे’च्या ‘फेसबूक’वरील पृष्ठालाही वाढता प्रतिसाद मिळत असून पृष्ठाची (पेजची) सदस्यसंख्या झपाट्याने वाढत आहे. Twitter, Pinterest आणि Instagram या संकेतस्थळांद्वारेही सनातनच्या संकेतस्थळाचा व्यापक स्तरावर प्रसार करण्यात येत आहे.

‘टेलिग्राम’वरील पृष्ठाची मार्गिका :

t.me/SSMarathi

t.me/SanatanSanstha

‘ट्विटर’वरील खात्याची मार्गिका : https://www.twitter.com/sanatansanstha

Pinterest वरील पृष्ठाची मार्गिका : https://www.pinterest.com/sanatansanstha/

Youtube : https://www.youtube.com/sanatansanstha

Apps

1. Sanatan Sanstha Android : https://www.sanatan.org/android

Sanatan Sanstha iOS : https://www.sanatan.org/ios

2. Sanatan Chaitanyavani Audio App : https://Sanatan.org/Chaitanyavani

3. Ritualistic worship (puja) and arti of Shri Ganesh Android : https://www.sanatan.org/ganeshapp

Ritualistic worship (puja) and arti of Shri Ganesh iOS : https://www.sanatan.org/iosganeshapp

4. Shraddh Rituals App Android :  https://www.sanatan.org/shraddh-app

5. Survival Guide App Android : https://www.sanatan.org/survival-guide-app

अध्यात्मशास्त्रावरील शेकडो शंकांचे निरसन करण्यात येणे

संकेतस्थळावर अध्यात्मातील विविध प्रश्न विचारण्यात आले आहेत. कुलदेवता, वाईट शक्ती, सुख-शांतीसाठी काय करावे ?, गुरु करणे, कर्मकांड, वास्तूशुद्धी, सूर्योपासना, नामजपातील अडथळे, श्राद्ध, विविध व्रते, अंत्यविधी, पूजाविधी, प्रदक्षिणा, देवघर, अग्निहोत्र, आध्यात्मिक पातळी, गुरुबंधू, पूर्वजांचा त्रास, सुतक अशा अध्यात्मातील अनेक अंगांविषयीचे जिज्ञासूंनी प्रश्न विचारले असून प्रत्येकाला त्याची उत्तरे पाठवण्यात आली आहेत. संकेतस्थळाकडे विविध ठिकाणांहून सनातन-निर्मित ग्रंथ आणि उत्पादने यांची मागणीही मोठ्या प्रमाणात होत आहे. आपणही आपल्या शंका विचारु शकता.

सनातन संस्थेचे व्यापक कार्य

‘सनातन संस्था’ ही ऋषीमुनी आणि संत-महंत यांनी धर्मशास्त्र हा आधारस्तंभ मानून समाज, राष्ट्र आणि धर्म यांच्या उन्नतीचा जो मार्ग दाखवला, त्यानुसार कार्य करणारी अग्रणी संस्था आहे. ‘सनातन संस्थे’चा दृष्टीकोन केवळ व्यक्तीची पारमार्थिक उन्नती होण्यापुरता मर्यादित नाही. सनातनने व्यक्तीसह समाज, राष्ट्र आणि धर्म यांच्या उत्कर्षाला प्राधान्य दिले आहे. त्यासाठी अध्यात्मप्रसार करण्यासह समाजसाहाय्य, राष्ट्ररक्षण अन् धर्मजागृती यांविषयी ‘सनातन संस्था’ विविध उपक्रम राबवते.

संकेतस्थळावर उपलब्ध असलेल्या ज्ञानाचे केलेले वर्गीकरण

 

संकेतस्थळावर उपलब्ध असलेले ज्ञान पुढील भागात वर्गीकृत करण्यात आले आहे.

 

अ. अध्यात्म जाणून घ्या !

यातील लेख प्रामुख्याने अध्यात्माची तात्त्विक माहिती देणारे आहेत, उदा. अध्यात्माचे महत्त्व, साधनामार्ग, सोळा संस्कार, जिवाची ईश्वरावरील श्रद्धा वाढवणारे शास्त्र – अनुभूती इत्यादी.

 

आ. अध्यात्म कृतीत आणा !

अध्यात्माच्या प्रायोगिक स्तरावरील लेखांचा यात अंतर्भाव करण्यात आला असून धर्मशिक्षण, सण, व्रते, उत्सव, काळानुसार योग्य साधनेचे महत्त्व, आध्यात्मिक त्रास आणि त्यांवरील उपाय, वास्तूशुद्धी, वाहनशुद्धी या विषयांवरील लेख ठेवण्यात आले आहेत. हिंदु धर्मातील प्रमुख सर्व सणांवरील लेखमालिका यात आहेत, उदा. गुढीपाडवा, श्रीरामनवमी, गणेशचतुर्थी, नवरात्र, दिवाळी, मकरसंक्रांत, महाशिवरात्र इत्यादी. साधनेच्या अनुषंगाने गुरुकृपायोगातील अष्टांगसाधनेतील प्रत्येक टप्प्याविषयीचे लेख (नाम, सत्संग, सेवा, त्याग) यात आहेत.

 

इ. विश्वव्यापी सनातन (हिंदु) धर्म

या वैशिष्ट्यपूर्ण विषयांतर्गत हिंदु धर्म, धर्मग्रंथ, हिंदू राष्ट्र, कुंभमेळा, अध्यात्माविषयीचे अपसमज आणि त्यांचे खंडण, हिंदु देवता यांविषयीचे लेख ठेवण्यात आले आहेत. ‘माय मराठी’च्या रक्षणासाठी प्रत्येकाने तळमळीने प्रयत्न करणे, ही काळाची आवश्यकता ओळखून मातृभाषा आणि सात्त्विक मराठी भाषेचे रक्षण अन् संवर्धन यांसाठी ‘मराठी राजभाषा दिना’निमित्त नुकतीच एक वैशिष्ट्यपूर्ण लेखमालिका संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.

 

ई. सनातनचे अद्वितीयत्व

या भागाच्या अंतर्गतआध्यात्मिक संशोधन, ईश्वरप्राप्तीसाठी कला, दैवी कण, आध्यात्मिक लाभ देणारी उत्पादने या विषयांवरील वैशिष्ट्यपूर्ण लेखांद्वारे सूक्ष्मातील अलौकिक ज्ञान विश्वाला देण्यात आले आहे.

 

उ. दृकश्राव्य दालन (व्हिडीयो गॅलरी) आणि श्राव्य दालन (ऑडियो गॅलरी)

दृकश्राव्य दालनांतर्गत (व्हिडीयो गॅलरी) ‘अध्यात्मशास्त्र’, ‘धार्मिक कृती’ आणि ‘आचारधर्म’ यांविषयीची चलचित्रे (व्हीडीयोज), तर श्राव्य दालनामध्ये (ऑडियो गॅलरीमध्ये) ‘विविध देवतांचे नामजप’, ‘देवतांच्या आरत्या’ ठेवल्या आहेत. तसेच सनातन-निर्मित देवतांची सात्त्विक चित्रेही संकेतस्थळावरून संरक्षित (download) करण्यासाठी ठेवण्यात आली आहेत.

 

ऊ. सूक्ष्म-जगताशी संबंधित अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण विभाग

सूक्ष्म म्हणजे पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील विश्व ! ‘अथर्ववेदा’तही सूक्ष्म-जगताशी संबंधित माहिती आहे. अनेक प्रगत राष्ट्रांतही विविध गुन्ह्यांची उकल करण्यासाठी एखाद्या व्यक्तीला पछाडलेल्या भूताचा वापर केला जातो. आज या अज्ञात शक्तींविषयी शास्त्रशुद्ध माहिती नसल्याने अनेकजण अंधश्रद्धांना खतपाणी घालतांना दिसतात. कित्येक जण तर भोंदू मांत्रिकांच्या फसवणुकीला बळी पडत आहेत. हे टाळण्यासाठी या जगताची माहिती देणारे पुढील अनोखे विभाग या संकेतस्थळावर आहेत.

जीवनातील ८० टक्के दुःखांमागे आध्यात्मिक कारण असते, असे अध्यात्मशास्त्र सांगते. त्यामुळे कित्येक शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक स्तरावरील दुःखांवर आध्यात्मिक स्तरावर उपचार करणे आवश्यक असते. त्यासाठी आध्यात्मिक स्वरूपाचे त्रास कसे असतात आणि त्यावर काय उपाय योजावेत, यांची माहिती देणारा विभाग !

आध्यात्मिक संशोधन

सनातनने ‘इलेक्ट्रोसोमॅटोग्राफिक स्कॅनिंग मशिन’ (DDFAO), ‘पॉलिकॉन्ट्रास्ट इन्टरफिअरन्स फोटोग्राफी’ (PIP), ‘इलेक्ट्रोस्कॅनिंग मेथड’ (ESM) आणि ‘गॅस डिस्चार्ज व्हिज्युअलायझेशन’ (GDV) या वैज्ञानिक उपकरणांद्वारे विविध प्रकारचे सहस्त्रो प्रयोग केले आहेत. या सर्व प्रयोगांच्या संशोधनांतून जीवनात साधना करण्याचे महत्त्व, तसेच भारतीय संस्कृती, संगीत, आहार इत्यादींचे श्रेष्ठत्व सिद्ध झाले आहे. त्याची माहिती या विभागात देण्यात आली आहे.

 

संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आलेल्या सुविधा

शुभेच्छापत्रे

नववर्ष, दीपावली या सणांच्या वेळी दिली जाणारी शुभेच्छापत्रे आणि विवाहपत्रिका सात्त्विक रचना अन् प्रबोधनपर माहितीसह उपलब्ध !

 

सात्त्विक रांगोळ्या

विविध देवतांची तत्त्वे आकृष्ट करणार्‍या सात्त्विक रांगोळ्यांच्या कलाकृती उपलब्ध !

 

‘ऑनलाईन’ प्रसारात वृद्धी – अन्य संकेतस्थळांद्वारे
सनातनच्या संकेतस्थळाचा व्यापक प्रसार करण्यात येणे

‘सनातन संस्थे’च्या ‘फेसबूक’वरील पृष्ठालाही वाढता प्रतिसाद मिळत असून पृष्ठाची (पेजची) सदस्यसंख्या झपाट्याने वाढत आहे. ‘ट्विटर’ आणि ‘गुगल प्लस’ या संकेतस्थळांद्वारेही सनातनच्या संकेतस्थळाचा व्यापक स्तरावर प्रसार करण्यात येत आहे.

‘ट्विटर’वरील खात्याची मार्गिका : https://www.twitter.com/sanatansanstha

Pinterest वरील पृष्ठाची मार्गिका : https://www.pinterest.com/sanatansanstha/

Instagram वरील पृष्ठाची मार्गिका : https://www.instagram.com/sanatansansthaofficial/

 

अध्यात्मशास्त्रावरील शेकडो शंकांचे निरसन करण्यात येणे

संकेतस्थळावर अध्यात्मातील विविध प्रश्न विचारण्यात आले आहेत. कुलदेवता, वाईट शक्ती, सुख-शांतीसाठी काय करावे ?, गुरु करणे, कर्मकांड, वास्तूशुद्धी, सूर्योपासना, नामजपातील अडथळे, श्राद्ध, विविध व्रते, अंत्यविधी, पूजाविधी, प्रदक्षिणा, देवघर, अग्निहोत्र, आध्यात्मिक पातळी, गुरुबंधू, पूर्वजांचा त्रास, सुतक अशा अध्यात्मातील अनेक अंगांविषयीचे जिज्ञासूंनी प्रश्न विचारले असून प्रत्येकाला त्याची उत्तरे पाठवण्यात आली आहेत. संकेतस्थळाकडे विविध ठिकाणांहून सनातन-निर्मित ग्रंथ आणि उत्पादने यांची मागणीही मोठ्या प्रमाणात होत आहे.

 

इच्छुकांनो, कार्यात सहभागी होण्यासाठी पुढील मार्गिकेवरील अर्ज भरा !

सनातन संस्थेच्या विविध विनामूल्य उपक्रमांत स्वयंसेवक, प्रायोजक किंवा अन्य हेतूने सहभागी होऊन धर्म आणि राष्ट्र यांच्याप्रती असलेले आपले कर्तव्य बजावण्यास इच्छुक असणार्‍यांसाठी पुढील मार्गिकेवर कार्यात सहभागी होण्याचा अर्ज ठेवण्यात आला आहे :

http://www.sanatan.org/sampark

सनातन संस्थेची वैशिष्ट्ये जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा !

सनातन संस्थेच्या ‘sanatan.org’संकेतस्थळाची ओळख आणि वैशिष्ट्ये

 

श्रीकृष्णकृपेने ख्रिस्ताब्द २०१२ च्या महाशिवरात्रीच्या मुहूर्तावर नव्या स्वरूपातील ‘sanatan.org’ संकेतस्थळाचा शुभारंभ झाला. ‘शास्त्रीय परिभाषेत धर्मशिक्षणाचा प्रसार अन् हिंदुहितासाठी कार्य’ या व्यापक उद्देशांनी कार्यरत असलेल्या सनातनच्या नव्या स्वरूपातील या संकेतस्थळाची लोकप्रियता वाढत आहे.

संकेतस्थळाचे वैशिष्ट्य म्हणजे त्यावरील अध्यात्मशास्त्रीय ज्ञानात ‘धर्मशास्त्रीय ज्ञान’ आणि ‘पृथ्वीवर उपलब्ध नसलेले ईश्वरीय ज्ञान’ या दोहोंचा समावेश आहे. त्यामुळे हे संकेतस्थळ अध्यात्मशास्त्रातील जिज्ञासूंपासून धर्मप्रसारकांपर्यंत आणि हिंदु समाजापासून अखिल मानवजातीपर्यंत सर्वांना मार्गदर्शक ठरत आहे.

 

संकेतस्थळाचे अलौकिकत्व अधोरेखित करणारी वैशिष्ट्ये

धर्मशिक्षण देण्याच्या उद्देशाने संकेतस्थळावर प्रत्येक हिंदूला त्याच्या आध्यात्मिक पातळीला अनुसरून शास्त्र सांगण्यात आले आहे. सर्वसाधारण व्यक्ती, प्राथमिक स्तरावरील साधक आणि शिष्य अशा प्रत्येकालाच उपयुक्त असे ज्ञान दिलेले आहे.

 

आता संकेतस्थळाची काही वैशिष्ट्ये पाहूया !

अ. देवतांची शास्त्रशुद्ध उपासना शिकवणारे

आ. आनंदी जीवन जगण्यासाठी आचारधर्म शिकवणारे

इ. अध्यात्मातील सर्व अंगांविषयी सखोल ज्ञान देऊन अध्यात्मातील प्रत्येक कृतीविषयी शास्त्रीय परिभाषेत उत्तरे देणारे

ई. अध्यात्माविषयी जिज्ञासा जागृत करून साधना शिकवणारे

उ. संसारात राहून साधना कशी करावी ? याविषयी मार्गदर्शन करणारे

ऊ. भूतलावर आतापर्यंत कोठेही उपलब्ध नसलेले ज्ञान देणारे

ए. शीघ्र ईश्वरप्राप्तीसाठी ‘गुरुकृपायोग’ शिकवणारे

ऐ. साधकांच्या शीघ्र आध्यात्मिक उन्नतीसाठी प्रयत्नरत असलेले

ओ. बलशाली ‘हिंदू राष्ट्र’ स्थापनेसाठी कार्यरत असलेले

औ. ‘संतांच्या मार्गदर्शनाखाली सिद्ध करण्यात आलेल्या या संकेतस्थळाच्या माध्यमातून आध्यात्मिकउपाय होणे’, हे ठळक वैशिष्ट्य असणारे एकमेवाद्वितीय संकेतस्थळ !

सनातन संस्थेची वैशिष्ट्ये

 

सनातन संस्थेची स्थापना राष्ट्ररक्षण आणि धर्मजागृती करण्यासाठी झाली असून तिचे कार्य ईश्वरी पाठबळावरच सुरू आहे, याची अनुभूती अनेक साधक, हितचिंतक घेत आहेत. हाच भाग इतरांना शब्दांच्या माध्यमातून अनुभवण्यासाठी येथे सनातन संस्थेची काही वैशिष्ट्ये संक्षिप्त स्वरूपात देत आहोत. यासाठी इतकेच सांगू शकतो की, ‘या, पहा अन् प्रत्यक्ष अनुभव घ्या !’

 

१. सनातनचे साधक आहेत, निर्गुण भाषेचे अधिकारी !

सनातनचे कित्येक साधक पोथ्या, पुराणे न वाचताही केवळ सेवेतून झालेल्या गुरूंच्या कृपेमुळे निर्गुण तत्त्वावर आधारित अध्यात्माची भाषा बोलतात. असाच अनुभव संस्थेचा बांधकाम विभाग, स्वयंपाकघर, तसेच सुतारकाम विभाग यातील साधकांना येतो. अध्यात्मात पंडिती विद्येपेक्षा गुरूंच्या कृपेचीच आवश्यकता असते, हे सनातनने सिद्ध केले आहे.

२. प्रकृतीमार्गानुसार साधक घडवणारी ‘सनातन’ ही एकमेव आध्यात्मिक संस्था !

सनातनमध्ये नाम, सत्संग, सेवा, त्याग आणि प्रीती या घटकांना महत्त्व देऊन प्रत्येकाला त्याच्या प्रकृतीनुसार ईश्वराकडे जाण्याचा मार्ग उपलब्ध करून दिला जातो. नृत्यकला, संगीतकला, चित्रकला, मूर्तीकला अशा विविध प्रकारच्या मार्गांतून त्या त्या साधकाला आध्यात्मिक स्तरावर मार्गदर्शन करून त्याला ‘ईश्वरप्राप्तीसाठी कला’, या उद्देशातून घडवले जाते.

३. स्वभावदोष आणि अहं निर्मूलन यांचे महत्त्व जाणणारी सनातन संस्था !

सनातनमध्ये जेवढा वेळ साधनेतील प्रमुख अडथळा असलेल्या स्वभावदोष निर्मूलनाला तसेच अहं-निर्मूलनाला दिला जातो, तेवढा वेळ अन्य संप्रदायांत दिला जात नाही; म्हणूनच सनातनच्या साधकांची जलद आध्यात्मिक उन्नती होऊन कित्येक साधक आता लहान वयातच संतपदाकडे वाटचाल करत आहेत.

४. प्रत्येक गोष्टीचे अध्यात्मीकरण करायला शिकवणारी सनातन संस्था !

सनातनमध्ये दैनंदिन जीवनातील प्रत्येक गोष्टीचे अध्यात्मीकरण करण्याला महत्त्व देऊन त्यामागचे शास्त्र सांगितले जाते आणि त्यासंदर्भात सहस्रो संशोधनात्मक सूक्ष्म-चित्रे, ध्वनीचित्र-चकती, आणि ग्रंथ यांची निर्मिती केली जाते.

५. अनेक विषयांवर चौफेर सखोल असे आध्यात्मिक संशोधन, हे सनातनचे अद्वितीयत्व !

सनातनसारखे अनेक विषयांवर सखोल शास्त्रीय भाषेतील आध्यात्मिक संशोधन विश्वातील कोणत्याच आध्यात्मिक संस्थेकडून केले जात नाही; म्हणूनच ती अद्वितीय आहे.

६. प्रत्यक्ष जीवनात ‘अध्यात्म’ जगायला शिकवणारी सनातन संस्था !

सनातनमध्ये अध्यात्माच्या तात्त्विक भागासह प्रायोगिक भागाचेही टप्प्याटप्प्याने शिक्षण दिले जाते आणि प्रत्येक साधकाकडे वैयक्तिक स्तरावर लक्ष देऊन त्याच्याकडून ती कृती योग्य पद्धतीने होत आहे का, ते पाहिले जाते. यामुळे साधक प्रत्यक्ष जीवनात अध्यात्म जगायला शिकतात.

– (पू.) सौ. अंजली गाडगीळ, रामनाथी आश्रम, गोवा.

उद्देश

 

विविध पंथियांना त्यांच्या पंथाप्रमाणे मार्गदर्शन !

२. संकुचित सांप्रदायिकता नव्हे, तर हिंदु धर्मातील व्यापक दृष्टीकोनानुसार शिकवण !

३. ‘व्यक्‍ती तितक्या प्रकृती, तितके साधनामार्ग’ या तत्त्वानुसार प्रत्येकाला आवश्यकता आणि क्षमता यांनुसार साधनाविषयक दिशादर्शन !

४. शीघ्र ईश्‍वरप्राप्तीसाठी सर्व योगमार्गांना सामावून घेणार्‍या ‘गुरुकृपायोग’ या योगमार्गानुसार साधना !

५. वैयक्‍तिक साधनेबरोबरच समाजाच्या उन्नतीसाठी करायच्या साधनेची शिकवण !

वैज्ञानिक परिभाषेत अध्यात्मप्रसार करून आदर्श समाजच्या निर्मितीसाठी गुरुकृपायोगानुसार साधना शिकवणारी सनातन संस्था

 

१. स्थापना

आंतरराष्ट्र्रीय कीर्तीचे संमोहन उपचारतज्ञ असलेले परात्पर गुरु डॉ. जयंत बाळाजी आठवले यांनी सनातन संस्थेची स्थापना सन १९९९ (२४.३.१९९९) मध्ये केली.

२. श्रद्धास्थाने

आंतरराष्ट्र्रीय कीर्तीचे मानसोपचारतज्ञ आणि संमोहन उपचारतज्ञ असलेले परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले हे ‘सनातन संस्थे’चे प्रेरणास्थान आहेत. परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे सद्‍गुरु इंदूरनिवासी संत प.पू. भक्‍तराज महाराज हे संस्थेचे श्रद्धास्थान आहेत. हिंदु धर्मातील सर्व देवता, धर्मग्रंथ, तीर्थस्थळे, संप्रदाय आणि संतमहंत यांच्याविषयी ‘सनातन संस्था’ पूज्यभाव बाळगते.

आपल्या आध्यात्मिक प्रवासाला आरंभ करा !

  ‘ज्याच्यापासून आपली निर्मिती झाली, त्याचा शोध घ्यावा, त्याच्याकडे जावे, असे प्रत्येकालाच वाटते. एखाद्याला मोठेपणी कळले की, तो समजतो ती त्य...